मे ०४, २००९

आयुष्य हे कांदे-पोहे

0 Comments

“सनई चौघडे” ह्या चित्रपटातील उत्कॄष्ट असे गाणे

किंवा: थेट लिंक

मराठी भाषा आणि मराठी माणसाची ओळख

0 Comments

नुकतेच झालेल्या मराठी विश्व साहित्य सम्मेल्नात श्रि अविनाश धर्माधीकारी ह्यांचे एक उत्कॄष्ट व्याख्यान

ऑगस्ट ३१, २००८

(इ) सकाळचा बातम्या आइकता का तुम्ही?

2 Comments
माझा सारखे तुम्ही पण नियमीत सकाळ-ची इ-आवॄत्ति वाचता का? आता अस्स्ल मराठीत त्यातल्या ठळक बातम्या ऐकणे पण शक्य आहे. इ-सकाळ चा वेबसाईटवर उजवीकडे दाखवलेले चित्र शोधा (तिथे हि ते उजवीकडेच आहे), व त्यावर क्लिक करा.

सकाळ नि सुरू केलेला हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडेल!

आले गणराय

1 Comments
इ-सकाळ मधे लहान मूलांनी काढलेली गणरायाची काही सुंदर चित्रे (पुर्ण पाहण्यास त्यावर क्लिक करा).


बाल कलाकारांचा हाताची ही सुंदर करामत पहून मला फ़ार प्रसन्न वाटले!

आणि हो! इ-सकाळची हि गणपती साठी विशेष तयार केलेली हि साईट पहायला विसरू नका.

गणपती बाप्पा मोरया!!

ऑगस्ट १९, २००८

गूगल आता भारतीय भाषेंमधे शोघा .. पण इंग्लीश लिपी वापरून!

0 Comments
गूगल ह्या सर्च इंजीनने नुकतेच मराठी भाषेतून शोधणे शक्य केले आहे. पण विशेष म्हणजे हे इंग्लीश लिपी वापरून करणे शक्य आहे. माझा सारख्या अनेक लोकांसाठी ही एक चांगली बातमी आहे. का? त्याचे असे आहे, माझे प्राथमिक शिक्षण इंग्लीश मधून झाले (तुम्ही म्हणाल - लेका ..शुद्धलेखन पाहूनच कळतय!), त्यामुले माझे मराठी वाचन आणि लिखाण तसे माफ़कच. माझे मराठी लेखन झालेच तर इंग्लीश लिपी वापरून असते. उदा. mi generally he ase marathi lihito :-)

पण जेव्हा मराठी मधे काही शोधायची वेळ येते तेव्हा मला अडचण होते. गूगलचा ह्या नवीन सोयीमुळे मी जरी उदा. कटाची आमटी बद्दल काही माहिती शोधायची असेल तर ती मि kataachi aamti म्हणून शोधू शकतो. ह्याचा फ़ायदा भरतात न जनमलेल्या मराठी लोकान्ना नक्कि होइल असे मला वाटते.

ह्याने एक मात्र नक्की होणार आहे - माझा सारख्या आळशी माणसाला मराठी न लिहायचे अजून एक कारण :-)

असो, ही सोय सध्या खालिल भाषेंसाठी उपलब्ध आहे:

English | বাংলা | తెలుగు | मराठी | தமிழ்हिन्दी

तर मग वाट कसली पाहाताय? तुम्ही पण वापरून पहा हि सोय! सुरुवात करण्यास वरील पैकी कोणत्याही लिंक वर क्लिक करा.

जानेवारी १८, २००८

पहिली पाउले - गूगल कॅलेंडर कसे वापरावे

0 Comments
मी नुकतेच काही मार्गदर्शक विडिओ तयार करायला घेतले. हे सर्व मराठीतुन असणार आहेत आणि ईंटरनेट बद्दल असणार आहेत. मला आशा आहे कि हे ऊपयोगी वाटतील. खाली माझा पहिला प्रयत्न आहे. अभिप्राय जरूर कळवावा.