ऑगस्ट १४, २००५

जय हिंद!



आज भारताचा ५८-वा स्वातंत्र्य दिवस. मी आज हि तितकाच अभिमानाने म्हणतो कि मि भारतीय आहे! आज ही राष्ट्र-गीत गाताना माझं ह्रुदय भरुन येतं. भारताबाहेर अल्यापसून आपल्या देशाचा अभिमान अजूनच तिव्रतेने जाणवतो. ईथे येउन सवरकरांच्या ओळींचा अर्थ लागतो - 'ने मजसि ने परत मात्रुभुमिला, सागरा प्राण तळमळा..'

आपुल्या मातीपसून दूर सगळं काही मिळतं, पण त्या माती विना त्याची न चव लागते, न तो आनंद मिळतो! आज ५८ वर्षांनंतर त्या सर्व स्वातंत्र सैनीकांना माझे अनेक प्रणाम - आज तुमच्या मुळे अम्ही स्वातंत्र्याचि फ़ळे चाखतोय. तुम्ही लावलेल्या झाडाची जणु फ़ळेच! असे झाड ज्याचे सिंचन-पालन तुम्ही आप्ल्या रक्ताने केलेत. तुम्हाला अनेक वंदना!

वंदे मातरम!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: