ऑगस्ट १९, २००८

गूगल आता भारतीय भाषेंमधे शोघा .. पण इंग्लीश लिपी वापरून!

गूगल ह्या सर्च इंजीनने नुकतेच मराठी भाषेतून शोधणे शक्य केले आहे. पण विशेष म्हणजे हे इंग्लीश लिपी वापरून करणे शक्य आहे. माझा सारख्या अनेक लोकांसाठी ही एक चांगली बातमी आहे. का? त्याचे असे आहे, माझे प्राथमिक शिक्षण इंग्लीश मधून झाले (तुम्ही म्हणाल - लेका ..शुद्धलेखन पाहूनच कळतय!), त्यामुले माझे मराठी वाचन आणि लिखाण तसे माफ़कच. माझे मराठी लेखन झालेच तर इंग्लीश लिपी वापरून असते. उदा. mi generally he ase marathi lihito :-)

पण जेव्हा मराठी मधे काही शोधायची वेळ येते तेव्हा मला अडचण होते. गूगलचा ह्या नवीन सोयीमुळे मी जरी उदा. कटाची आमटी बद्दल काही माहिती शोधायची असेल तर ती मि kataachi aamti म्हणून शोधू शकतो. ह्याचा फ़ायदा भरतात न जनमलेल्या मराठी लोकान्ना नक्कि होइल असे मला वाटते.

ह्याने एक मात्र नक्की होणार आहे - माझा सारख्या आळशी माणसाला मराठी न लिहायचे अजून एक कारण :-)

असो, ही सोय सध्या खालिल भाषेंसाठी उपलब्ध आहे:

English | বাংলা | తెలుగు | मराठी | தமிழ்हिन्दी

तर मग वाट कसली पाहाताय? तुम्ही पण वापरून पहा हि सोय! सुरुवात करण्यास वरील पैकी कोणत्याही लिंक वर क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: