एप्रिल २०, २००७

आता मराठीतुन ब्लॉग करणे अजूनच सोपे.

आता मराठीतुन ब्लॉग करणे किती सोपे झाले आहे, काय सांगु! मी खालिल दोन पद्धति वापरतो:
  1. बरहा आय-एम-इ (म्हणजे?) माझी आवडती पद्धत.
    1. प्रथम, सॉफ़्टवेर मिळवा (लिंक) व ईन्सटॅल करा. ते झाले की रन करा. एक लक्शात ठेवा, इथे स्क्रीन वर फ़ारसे काही दिसत नाही. पण तुमच्या "सिस्टम ट्रे" मध्ये एक छोटासा आयकॉन दिसू लागतो (असा).
    2. त्यावर राईट-क्लिक करून आधी "Language" मग "Marathi" असे सिलेक्ट करा. ह्याने हे सॉफ़्टवेर मराठीत अक्शरे वापरू लागेल. इथे एक नोंद घेता येईल. हे सेटिंग बदलुन तुम्हाला ईतर भाषा ही वापरता येतील (सही ना!). आता हा आयकॉन MA असे दाखवु लागेल. MA = मराठी, बरर का ;)
    3. आता तुमचे काम झालेच. तुम्ही आता जे काही आणि जिथे कुठे टाइप कराल ते मराठीत असेल. ह्या "मोड" मध्ये मराठी लिहायचे कसे हे मात्र आधि थोडे वाचायला विसरू नका (इथे). मला विचाराल तर फ़ारच सोपे आहे. एकदा सराव झाला कि बसस!
    4. आणि हो! महात्वाचे एक. परत ईंग्लीश मध्ये येण्यास F11 दाबा. ह्या पुढे F11 दाबून तुम्हि ईंग्लीश व मराठी "मोड्स" मध्ये ये-जा करू शकता. काय? आहे कि नाही सोपे? हि पद्धत तुम्हि कुठे हि मराठी टाईप करण्यास वापरू शकता. उदा. चॅटींग, ई-मेल, डॉक्युमेंट्स किंवा ह्या सार्ख्या ब्लॉग मध्ये देखील.
  2. ही पद्धत गुगल ब्लॉगर-स्पेसिफ़ीक आहे. त्याचे डिटेल वेब-पेज ईथे सपडेल.
जर तुम्हाला हि माहिती फ़ायदेशिर ठरली आणि मराठी लिहीण्यात यश आले, तर मला जरूर कळवा. खाली एक कॉमेंट टाकली तरी छान. आणी काही प्रष्ण व अधिक माहिती असेल तरी पण विचारा - बिनधास्त!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: